राजकीय वातावरणात 'उकाडा फुटला' ठाकरेंना वाऱ्यावर सोडले

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मुंबई
uddhav thackeray शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात तीव्र झाली आहे. पक्षाचे तब्बल सहा खासदार फुटल्याचे आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या खासदारांचा लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
 

uddhav thackeray 
दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे गटात सध्या प्रचंड अस्वस्थता आणि अंतर्गत खदखद सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खासदारांमधील नाराजी जशी उघड झाली आहे, तशीच स्थिती आमदारांमध्येही असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे. पक्ष नेतृत्वाकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी नाराज असून ते लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
शंभूराज देसाई यांनी नमूद केले की, uddhav thackeray  विकासकामांसाठी आवश्यक पाठपुरावा होत नसल्याने खासदार आणि आमदार दोघांनाही मतदारसंघातील कामे पूर्ण करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे जनतेसमोर काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न अनेकांना पडत असल्याचे त्यांनी म्हटले. या असंतोषातून भविष्यात आणखी राजकीय हालचाली आणि संभाव्य बंडाची पुनरावृत्ती होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले.या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेचा उल्लेख करत संघटनात्मक विस्तार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत पक्षात आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याचेही शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, ठाकरे गटातील या कथित फुटीमुळे आणि शिंदे गटाच्या दाव्यांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. या घडामोडींवर ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.