जबरी चोरी होताच 20 मिनिटांत आरोपी जेरबंद

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
तीन युवकांसह दोन अल्पवयीन मुले ताब्यात
20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महागाव, 
Thief apprehended महागाव पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 20 मिनिटांत छडा लावला आहे. एका नागरिकाला मारहाण करून 24 हजार रुपये लुटणाèया टोळीतील 3 मुख्य आरोपींसह 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या ‘क्विक अ‍ॅक्शन’मुळे तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे. नागपूर येथील रहिवासी सुभाष तिवारी हे 17 जून रोजी रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास महागाव येथे आले होते. जुन्या बस स्थानकाचा रस्ता शोधत असताना एका मोटरसायकलवर तीन अनोळखी इसम आले. त्यांनी तिवारी यांना चापट मारून त्यांच्या खिशातील 400 रुपये काढून घेतले.
 
 
chori
 
त्यानंतर लगेच त्याच ठिकाणी दुसèया मोटरसायकलवर दोन इसम आले. त्या पाचही आरोपींनी तिवारी यांना ‘बस स्टँड दाखवतो’ असे सांगून जबरदस्तीने स्वतःच्या मोटरसायकलवर बसवले आणि तहसील कार्यालयाच्या पाठीमागे नेले. तिथे त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील 23,600 रुपये हिसकावून घेतले. अशी एकूण 24,000 रुपयांची रोकड लुटून आरोपी दुचाकीवरून फरार झालेे. या घटनेनंतर सुभाष तिवारी यांनी महागाव पोलिस ठाण्यात आपबीती कथन केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आरोपींचे कोणतेही सुगावे नसताना, पोलिसांनी तातडीने तपाससूत्रे हलवली.
 
 
 
गुरुवार, 18 जून रोजी पहाटे पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून संशयितांची शोधमोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दिगंबर विलास नरवाडे (वय 27), बुद्धभूषण महेंद्र बनसोडे (वय 22), बुद्धभूषण रमेश कांबळे (वय 26, महागाव) यासोबतच 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील 21,100 रुपये हस्तगत करण्यात आले. ही धडक कारवाई उमरखेड उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील अंबुरे, उपनिरीक्षक किशोर मुरकुटे, वसीम शेख, राजू शरमते, स्वप्निल रायवाडे, गणेश धिटे, विवेक पारडकर यांनी केली आहे.