उद्धवांचे खासदार गेले आता आमदारांची पाळी?

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
मुंबई,
turn of Uddhav's MLAs शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहे. पक्षात उभी फुट झाली. लवकरच 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील. लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी स्वतंत्र गटाकरिता पत्र देखील दिले. यादरम्यानच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी हैराण करणारा खुलासा केला. ज्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येऊ शकतो. शंभूराज देसाई यांनी म्हटले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आणि खदखद आहे. पक्षातील खासदारांमधील नाराजी ज्याप्रमाणे समोर आली आहे, तशीच परिस्थिती आमदारांचीही आहे. पक्ष नेतृत्वाकडून कोणतेही पाठबळ मिळत नसल्याने उबाठा गटाचे आमदार लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात, असा खळबळजनक दावा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

uddhav thackeray in tension
 
 
 
बंडाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
ऑपरेशन टायगर आणि आमदारांची नाराजी याबाबत विचारले असता शंभूराज देसाई यांनी म्हटले की, उबाठा गटाच्या 6 खासदारांमध्ये असलेली अस्वस्थता त्यांच्या कृतीतून उघड झाली आहे. आमदारांची परिस्थिती तर यापेक्षा वेगळी नाही. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी पक्ष नेतृत्व त्यांना कोणतीही मदत करत नाही. जनतेला काय उत्तर द्यायचे असा प्रश्न या आमदारांना पडला आहे.त्यामुळे खासदारांप्रमाणेच आमदारांच्या बाबतीतही बंडाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट संकेत शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.
 
 
 
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांचे स्वप्न होते की, राज्याच्या प्रत्येक घराच्या उंबरठ्याआड एक शिवसैनिक असावा. त्यानुसार वाडी, वस्ती आणि वॉर्डावॉर्डात शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज झालो आहोत, 2022 नंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलल्याचे सांगत गेल्या दोन वर्षांत आमच्या पक्षातील आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले.