अध्यक्ष : डॉ. सतपाल सोवळे, सचिव : डॉ. ताराचंद कंठाळे
यवतमाळ,
vidarbha sahitya sangh, yavatmal विदर्भ साहित्य संघाच्या मार्गदर्शनानुसार यवतमाळ शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सतपाल सोवळे यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी झालेल्या सभेत 2026-31 या कालावधीसाठी पदाधिकाèयांची निवड करण्यात आली. विदर्भ साहित्य संघ यवतमाळ शाखाध्यक्ष डॉ. सतपाल सोवळे यांनी या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाèयांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. या नवीन रचनेत उपाध्यक्षपदी अॅड. जीवन पाटील व नितीन पखाले यांची तर सचिवपदी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांची निवड करण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातीला विदर्भ साहित्य संघाच्या निर्देशानुसार अॅड. जीवन पाटील यांना आणि यवतमाळ शाखाध्यक्षांच्या प्रस्तावानुसार ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे यांना स्वीकृत सदस्य म्हणून सामावून घेण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला व त्यांना सभेच्या कामकाजात सहभागी करून घेण्यात आले.
त्यानंतर घोषित करण्यात आलेल्या इतर पदाधिकाèयांमध्ये सहसचिव म्हणून धनंजय पांडे व विद्या खडसे, कोषाध्यक्ष म्हणून प्रा. अतुल सारडे, कार्यक्रम प्रमुख म्हणून डॉ. ललिता घोडे तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून प्रा. विनोद भगत यांची निवड करण्यात आली. यासोबतच कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिरुद्ध पांडे व मोरेश्वर पुंडशास्त्री कार्यभार सांभाळणार आहेत. शाखेच्या स्थानिक कार्यकारणीमध्ये केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी डॉ. देवेंद्र पुनसे व विवेक कवठेकर निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट आहेत. शाखेला योग्य दिशा देण्यासाठी निमंत्रित मार्गदर्शक म्हणून डॉ. रमाकांत कोलते, मदन येरावार आणि डॉ. श्रीधर देशपांडे यांच्या नावांना मान्यता देण्यात आली. या निवडीबद्दल जिल्ह्यातील साहित्यिक क्षेत्रातून सर्व पदाधिकाèयांचे अभिनंदन होत आहे.