वर्धा,
banana farmers demand विदर्भातील केळी उत्पादक शेतकर्यांना जळगाव, बर्हाणपूर व इतर बाजारपेठांच्या तुलनेत मिळणार्या अत्यल्प दरांबाबत तसेच केळी पिकाचा संपूर्ण वर्धा जिल्ह्यात पीक विमा योजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी आज २९ रोजी वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाचे संयोजक डॉ. सचिन पावडे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नुमद केल्यानुसार, जळगाव व बर्हाणपूर परिसरातील बाजारपेठांमध्ये केळीला मिळणारे दर आणि विदर्भातील बाजार समित्यांमध्ये मिळणारे दर यामध्ये मोठी तफावत असून त्यामुळे विदर्भातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मे २०२६ मधील अभूतपूर्व उष्णतेमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यातच दरातील विषमता शेतकर्यांसाठी गंभीर संकट निर्माण करीत आहे. केळीच्या दरातील तफावतीची उच्चस्तरीय चौकशी, न्याय्य बाजारभावाची हमी, व्यापारी कार्टेलची चौकशी तसेच वर्धा जिल्ह्यातील केळी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी banana farmers demand वान्मथी सी. यांनी केळी पिकाचा जिल्ह्यासाठी पीक विमा योजनेत समावेश करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली. विदर्भ हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रदेश असून केळी उत्पादकांवर उष्णतेमुळे झालेले नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अन्यायकारक दर यामुळे दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून विदर्भातील केळी उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.