अट्टल दुचाकी चोरट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चार दुचाकी जप्त

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
वाशीम,
Washim bike theft case वाशीम आणि मालेगाव परिसरातून दुचाकी लंपास करणार्‍या एका अट्टल चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उमेश किशन राठोड (वय ४५ ) रा. धुमका असे या अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या मुसया आवळून त्याच्या ताब्यातून तब्बल १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
 

Washim bike theft case 
वाशीम शहरातील रहिवासी श्रीकांत मदनलाल दंबीवाल (वय ४५) यांची हिरो सिटी डिलस कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच ३७ एएल ३३४७) चोराने त्यांच्या घरासमोरूनच चोरून नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली होती. या चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. तपास सुरू असतानाच, गुन्ह्यातील मोटारसायकल धुमका येथील एका इसमाने चोरल्याची गोपनीय माहिती स्थागुशा चे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली. त्यावरुन पोलिस उपनिरीक्षक निलेश जाधव आणि पोलिस अंमलदारांचे विशेष पथक तात्काळ धुमका परिसराकडे रवाना करुन मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ जून २०२६ रोजी संशयित आरोपी उमेश किशन राठोड याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या या चोराला पोलिसांनी खाया दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.
 
पोलिसांनी सर्वप्रथम त्याच्याकडून श्रीकांत दंबीवाल यांची चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत केली.त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने वाशीम शहर आणि मालेगाव परिसरातूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकूण ४ मोटारसायकल (किंमत १,९५,००० रुपये) जप्त केल्या.
 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, मानोरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक नयना पोहेकर, पोलिस उपनिरीक्षक निलेश जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी केली.