राम मंदिरातील खळबळजनक खुलासे

पुजारी, टिन्नू यादव संशयाच्या घेऱ्यात

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
अयोध्या
ayodhya ram mandir  अयोध्येतील दान चोरी प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून या प्रकरणी तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. एसआयटी ट्रस्टशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे. विशेष म्हणजे, तपासादरम्यानच रामललाचे हार आणि पादुकाही गायब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचीही चोरी झाली असावी, असा संशय व्यक्त केला जातो आहे.
 
ramlala
 
ayodhya ram mandir  एसआयटीने दान चोरी प्रकरणी पुन्हा एकदा गोपाळ राव आणि टिन्नू यादव यांची चौकशी केली आहे. राम मंदिराच्या पुजाèयांकडेही हिरेजडित हार आणि पादुकांबद्दल विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे. यावर पुजाèयाने सांगितले की, हार आणि पादुका परिधान केल्यानंतर टिन्नू यादवकडे परत करण्यात आल्या होत्या. तर टिन्नूने दावा केला की, या वस्तू वितळवून सोन्याच्या विटा करण्याचे ठरले होते.
ayodhya ram mandir  दुसरीकडे, दागिने सांभाळणारे कृष्णदेव तिवारी यांच्याकडे विचारणा केली असता तिथे सोन्याची वीटही सापडली नाही आणि कोणती पावतीही मिळाली नाही. आता या प्रकारानंतर सीसीटीव्ही फुटेज, बँकिंग रेकॉर्ड, डिजिटल डेटा आणि संबंधित कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.
ayodhya ram mandir  आतापर्यंत 100 हून अधिक लोकांची चौकशी
तपास यंत्रणांनी आतापर्यंत अनेक कर्मचारी, सेवेकरी आणि दान मोजणी प्रक्रियेशी संबंधित लोकांची चौकशी केली आहे. ही संख्या 100 हून अधिक आहे. काहीजणांची एकापेक्षा जास्त वेळा चौकशी करण्यात आली आहे.