कर्मचारी, नागरिकांत दहशत
बाभुळगाव,
Wild boar गुरुवारी दुपारी अचानकपणे एक रानडुक्कर तहसील कार्यालयाच्या आवारात घुसले. तत्पूर्वी त्याने तहसील कार्यालयात आलेल्या गणोरी येथील अंबादास बनसोड यांना जोरदार धडक दिली यात ते किरकोळ जखमी झाले. मोठे दात असलेले हे रानडुक्कर काही दिवसांपासून नागरिकांवर चवताळून जातेे आहे. अशाच प्रकारे त्याने गुरुवार, 18 जूनच्या दुपारी तहसील कार्यालयात येणाèया गणोरी येथील अंबादास बनसोड यांना गेटजवळ जोरदार धडक दिली. यात ते जमिनीवर कोसळले.
नागरिकांनी आरडाओरडा केल्याने तेे तहसील कार्यालयाच्या गेटमधून आत घुसले. कर्मचारी बसतात तेथे शिरणार तेवढ्यात राजेश बोबडे यांनी मोठ्याने ओरडून सूचना दिली. त्यांनी तहसील कार्यालयाचे आतील चॅनेल गेट बंद केले. त्यामुळे रानडुक्कर बाजूच्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या दिशेने निघाले. तेथील कर्मचारी घाबरून सैरावैरा पळाले. तेथील महिला कर्मचाèयांनी मोठ्या हिमतीने त्यांच्या कार्यालयाचे मेन गेट बंद केले व सर्व कर्मचारी भयभीत होऊन आतमध्ये बसले.
तहसील कार्यालयाच्या संरक्षक भिंतीमुळे त्याला बाहेर निघता येत नव्हते. उपस्थित नागरिकांनी हल्ला, कल्ला करून त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तेे रानडुक्कर परत, परत आरडाओरड करणाèयांच्या अंगावर जात होते. अखेर त्याला तहसील कार्यालयाचे धान्य गोदामाचे दुसरे गेट दिसले. तेथून ते श्याम जगताप यांच्या शेतात प्रवेश करून माणिकराव पांडे यांच्या शाळेकडे पळाले. दोन आठवड्यांपूर्वीही हेच रानडुक्कर परिसरात लोकांच्या अंगावर धावून जात होते. नागरिकांनी वनविभागाच्या धर्माळे यांना दूरध्वनीवर सूचना दिली. धर्माळे यांनी त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी पाठविले. मात्र रानडुक्कर प्रवीण तातेड यांच्या लेआऊटमधून पुढे पळाले. या रानडुकराची नागरिकांत दहशत पसरली आहे. पुढील अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने त्याला पकडावे, असे नागरिकांची मागणी आहे.