दत्ता मेघे महाविद्यालयात योग दिन उत्साहात

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Datta Meghe College पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून तसेच केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सोनाली वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनाल वानखेडे आणि डॉ. स्नेहा बोरकर यांनी केले. यावेळी यौगिक क्रिया, मुद्रा, आसने तसेच षडचक्र यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
 
Datta Meghe College
 
डॉ. अनघा गोसावी आणि डॉ. आश्लेषा गुंड्रे यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली कशी घडते, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ. गीता साठवणे, डॉ. संतोष पुसदकर, डॉ. विग्नेश पिल्लई आणि डॉ. कौस्तुभ भोयर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी योगाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून ‘निरोगी भारत’च्या संकल्पनेला अधिक बळ मिळाले.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र