वॉशिंग्टन
Donald Trump अफाट व्यस्त वेळापत्रक, विरोधकांचे सातत्याने होणारे राजकीय हल्ले आणि जागतिक महासत्तेची धुरा सांभाळताना वाढणारे प्रचंड दडपण; या सगळ्या वातावरणातही जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक क्षमता नेमकी कशी आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 22 तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकाने अत्याधुनिक चाचण्यांच्या माध्यमातून केलेल्या सखोल तपासणीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेंदूची तीक्ष्णता आणि निर्णयक्षमता आजही कितपत तंतोतंत आहे, याचे थक्क करणारे आकडे समोर आले आहेत.
Donald Trump विशेष म्हणजे, वाढत्या वयाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत, त्यांच्या हृदयाचे जैविक वय हे त्यांच्या वास्तविक वयापेक्षा तब्बल 14 वर्षांनी कमी असल्याचे आढळून आले आहे. वजन वाढणे आणि हातावरील काही रहस्यमयी निळ्या खुणा यांसारख्या वैद्यकीय बाबींवर डॉक्टरांनी नेमका काय सल्ला दिला आहे आणि या ‘सुपर पॉवरफुल’ नेत्याला फिट ठेवण्यासाठी सध्या कोणती औषधे सुरू आहेत, याचा एक लेखाजोखा आता समोर आला असून, पारदर्शकतेच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आंतरराष्ट—ीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील महिन्यात 14 जून रोजी 80 वर्षांचे होणार आहेत. मात्र, या वयातही ते पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केलेल्या नव्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या तीन पानांच्या वैद्यकीय अहवालात ट्रम्प यांची प्रकृती उत्कृष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.