तिरुवनन्तपुरम्
Monsoon आजपासून देशात मान्सूनसाठी वातावरण अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे. मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र, नव्या अंदाजानुसार 1 जून आणि आता तर हा प्रवास अजून लांबणीवर पडला आहे. मान्सून 4 जूनंतर दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या वेशीवर येण्यासाठी १० जून उजाडण्याची शक्यता आहे.
Monsoon हवामान प्रणालीनुसार मान्सून सध्या केरळच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. एरवी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा तो नेहमीच्या वेळेपेक्षा किंचित संथ गतीने पुढे सरकत आहे. एल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासात खूप अडथळे निर्माण झाले आहेत. अरबी समुद्रात बनलेले चक्राकार वारे पश्चिमेकडील मान्सूनच्या वाèयांना थोडे रोखून धरत आहेत.
Monsoon हे वारे हळूहळू निवळत असून पुढील ३ ते ४ दिवसांत, म्हणजेच ३ किंवा ४ जून २०२६ पर्यंत मान्सून केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये अधिकृतपणे धडक देईल, असा ठाम अंदाज आहे. ४ जूननंतर केरळमधील पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. महाराष्ट्रातही ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मान्सून पूर्व पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला आहे. त्यामुळे डोंगराळभागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Monsoon राजस्थानमधील जैसलेमर, जोधपूर आणि बाडमेर भागात पुढील दोन दिवस जोरदार धुळीची वादळे आणि आंधी येण्याची शक्यता आहे. 4 जूननंतर देशातील हवामान वेगाने बदलणार असून, मान्सूनच्या आगमनाने अनेक राज्यांमध्ये झमाझम पावसाला सुरुवात होईल.