प्रा. अभय जोशी यांना डॉक्टरेट

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
प्रा. अभय जोशी यांना डॉक्टरेट

उमरखेड : 
Abhay Joshi Awarded Doctorate येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे  महाविद्यालयातील प्रा. अभय सुभाष जोशी यांना नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मराठी विषयात आचार्य (पीएचडी) पदवी जाहीर केली आहे. ‘आशा बगे यांच्या कथात्म वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अकॅडेमिक काऊन्सिलचे सदस्य आणि अचलपूरच्या छगनलाल मूलजीभाई कढी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काशिनाथ बèहाटे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी हे संशोधन कार्य पूर्ण केले. 
 
 
JOSODI
 
प्रा. अभय जोशी यांचे ‘कातरवेळी’ , ‘बाकी उरते शून्य’ हे कथासंग्रह,  ‘सांजसावल्यांच्या प्रदेशात’ ललितलेख  संग्रह,  ‘मारव्यात डोकावताना’ व ‘मराठी कादंबरी : प्रवाह व समीक्षा’ हे समीक्षाग्रंथ ही पुस्तके   प्रकाशित झाली असून त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानचा राज्य पुरस्कार व नाशिकच्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या ‘राष्ट ́ीय कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. जोशी यांचा ‘चंद्रशिल्प’ ब्लॉग असून ते नियमितपणे ब्लॉग लेखन करतात.
 
डॉक्टरेट मिळाल्याबद्दल प्रा. अभय जोशी यांचे जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ. यादव राऊत आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम, उपप्राचार्य डॉ. नवीन
जांभेकर, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. बालाजी लाभसेटवार, पर्यवेक्षक प्रा. गणेश जाधव, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक मित्र यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.