10 हजारांची लाच मागणाऱ्या महिला पाेलिस उपनिरीक्षकाला अटक

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
- वाठाेडा पाेलिस ठाण्यात मागितली लाच

अनिल कांबळे
नागपूर, 
bribery case वाठाेडा पाेलिस ठाण्यात कार्यरत महिला पाेलिस उपनिरीक्षकाला 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. पाेलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनके असे लाचखाेर पीएसायचे नाव असून विनयभंगाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी लाच मागितली हाेती. ही लाचेची मागणी गेल्या तीन महिन्यांपूर्वीची असून आतापर्यंत पीएसआय प्रणाली बेनके या अचानक बेपत्ता झाल्या हाेत्या, त्या नागपुरात येताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे. या प्रकरणात तत्कालिन ठाणेदार यांची ‘ऑडिओ रेकाॅर्डींग’ असून त्यांच्यावरही कारवाई हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
dkslsl
 
एसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने केलेल्या कामाचे कमिशन न दिल्यामुळे तिच्याविराेधात एका युवकाने वाठाेडा पाेलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला हाेता. त्यानंतर संबंधित महिलेने तक्रारदाराविराेधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणात तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी पाेलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांनी एका खासगी व्यक्तीर्माफत 28 ेब्रुवारी 2026 राेजी 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने गाेपनीय पडताळणी सुरू केली. 6 मार्च 2026 राेजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाली. चाैकशीदरम्यान संबंधित महिला अधिकाèयाने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केल्याचेही उघड झाले. नंतर चर्चेनंतर 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मात्र, पुढे संबंधित महिला अधिकाèयांना तक्रारदाराबाबत संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही लाचेची मागणी केल्याचे पुरेसे पुरावे मिळाल्याने एसीबीने मंगळवारी (2 जून) त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विराेधात वाठाेडा पाेलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही कारवाई पाेलिस अधीक्षक डाॅ. दिगंबर प्रधान, अपर पाेलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाेलिस उपाधीक्षक शुभांगी वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.