बर्मिंगहॅम
British Open पुरुष एकेरीच्या दुसèया फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल 10 खेळाडूंपुढे भारताचे अभय सिंग आणि वीर चोत्रानी प्रबळ आव्हान उभे करू शकले नाहीत. आपापले सामने गमावल्याने ते ब्रिटिश ओपन स्क्वॅशमधून बाहेर पडले.
British Ope जागतिक क्रमवारीत 24 व्या क्रमांकावर असलेल्या अभयला इजिप्तच्या जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद झकारियाकडून 9-11, 4-11, 11-7, 10-12 अशा अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.
British Ope दुसèया एका सामन्यात, जागतिक क्रमवारीत 40 व्या क्रमांकावर असलेल्या चोत्रानीला वेल्सच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या जोएल मॅकिनने 12-10, 11-9, 11-3 असे पराभूत केले. अनाहत सिंग आणि रमित टंडन गेल्या आठवड्यात स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेर पडले होते.