सणाच्या गर्दीत पिकअपची धडक, ६ ठार; १३ जखमी

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
कोलंबो,
Colombo Rocked श्रीलंकेत बौद्ध धर्मीयांच्या पवित्र वेसाक सणादरम्यान झालेल्या एका भीषण अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. कोलंबोच्या बाहेरील मीगोडा उपनगरात रस्त्याच्या कडेला सण साजरा करणाऱ्या गर्दीत एका पिकअप वाहनाने अचानक धडक दिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
Colombo Rocked
 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वेसाक सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक नागरिक रस्त्यालगत उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर थांबले असताना ही दुर्घटना घडली. Colombo Rocked त्याच वेळी एका पिकअप चालकाने नियंत्रण सुटल्याने थेट गर्दीत वाहन घुसवले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.
 
पोलिसांच्या प्राथमिक तपासात चालकाने मद्यपान केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ४२ वर्षीय चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला होता, मात्र काही अंतरावर त्याला अटक करण्यात आली. Colombo Rocked जखमींमध्ये एका लहान बाळासह अनेकांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
वेसाक हा बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मे महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. Colombo Rocked या काळात श्रीलंकेत विविध ठिकाणी मोफत अन्नवाटप व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते.