मुंबई,
Deool Band 2's impressive प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारले असून, अवघ्या 12 दिवसांत या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई करत आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित आणि भावनिक कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मोहन जोशी यांच्या दमदार अभिनयालाही प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये स्वामी भक्त आणि सिनेप्रेमींची गर्दी कायम असल्याने अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल दिसत आहेत.

बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, ‘देऊळ बंद 2’ने 12व्या दिवशी सुमारे 2.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचबरोबर चित्रपटाने 12 दिवसांत 50 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तुलनेने कमी बजेटमध्ये, म्हणजे सुमारे 10 कोटी रुपयांत तयार झालेला हा चित्रपट, आता दुप्पटपेक्षा अधिक कमाई करत सुपरहिट ठरला आहे.देशांतर्गत पातळीवर चित्रपटाने सुमारे 54.88 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले असून नेट कमाई 46.65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रदर्शना नंतरच्या दिवसांतही चित्रपटाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. नवव्या दिवशी 3.10 कोटी, दहाव्या दिवशी 5 कोटी आणि अकराव्या दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई झाली होती.सोमवारी म्हणजेच 12व्या दिवशी पुन्हा 2.60 कोटींची भर पडल्याने चित्रपटाची कमाई स्थिर राहिल्याचे दिसून येते. प्रेक्षकांचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आपला मजबूत ठसा उमटवत आहे.