आग्रा,
Dramatic Brawl Outside Hotel उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात पती, पत्नी आणि कथित प्रेयसी यांच्यातील वादाचा थरारक प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हॉटेलमध्ये सुरू झालेला हा वाद रस्त्यावर पोहोचत दोन महिलांमध्ये थेट हाणामारीपर्यंत गेला.ही घटना ताजगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एक विवाहित युवक आपल्या कथित प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये आला होता. याची माहिती मिळताच त्याची पत्नी थेट हॉटेलमध्ये पोहोचली आणि तिथे पतीला प्रेयसीसोबत पाहताच तिचा संताप अनावर झाला.
हॉटेलमध्ये सुरुवातीला तिन्ही व्यक्तींमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद चिघळला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गोंधळ वाढल्यानंतर पतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत प्रेयसीला हॉटेलमधून बाहेर पाठवले.मात्र, हॉटेलबाहेर गेल्यानंतरही वाद शांत झाला नाही. प्रेयसी स्कूटीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पत्नीने तिला अडवले आणि स्कूटी थांबवत खाली ओढले. त्यानंतर दोघींमध्ये रस्त्यावरच जोरदार झटापट सुरू झाली.

या झटापटीत दोन्ही महिलांनी एकमेकींचे केस ओढले, तसेच मारहाण केली. पत्नीने प्रेयसीवर चपलांनी हल्ला केला, तर प्रत्युत्तरात प्रेयसीनेही तिला खाली पाडत रस्त्यावर ओढल्याचे समोर आले आहे. या गोंधळात पत्नीचे कपडेही फाटल्याची माहिती मिळत आहे.रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून दोन्ही महिलांना वेगळे केले. त्यानंतर कथित प्रेयसी घटनास्थळावरून निघून गेली. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलमध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दरम्यान, या प्रकरणाबाबत ताजगंज पोलिसांनी सांगितले की, अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.