बंगालमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धास्ती

आता ममतांच्या हाती धुपाटणं येणार?

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
कोलकाता
Bengal politics विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस (टीएमसी) समोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासमोर आता पक्ष वाचवण्याचे आव्हान उभं राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. बंगालच्या राजकारणात महाराष्ट्र पॅटर्न सुरू होणार असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचाही पक्ष धोक्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
 

mamta 
कोलकातामधील आमदार निवास भूकंपाचं केंद्र?
Bengal politics सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूलमधून हकालपट्टी झालेले आणि नाराज असलेले नेते गेल्या काही दिवसांपासून कोलकाता येथील ’एमएलए हॉस्टेल’मध्ये सातत्याने गुप्त बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये तृणमूलचे भविष्य, पक्ष संघटनेतील बदल आणि एका नव्या राजकीय पर्यायाची चाचपणी केली जात असल्याचे समजते. या गुप्त हालचालींनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढवली आहे.
दोन आमदारांच्या हकालपट्टीनंतर ठिणगी
Bengal politics तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाने पक्षाविरोधी कारवायांचा आरोप ठेवत उलुबेरिया पूर्वचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि एंटालीचे आमदार संदीपन साहा यांची पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली. या कारवाईनंतर वादाची ठिणगी पडली आहे. या दोन्ही आमदारांनी विरोधी पक्षनेत्याशी संबंधित प्रस्ताव आणि स्वाक्षरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. संदीपन साहा यांनी आरोप केला होता की, बैठकीला अनुपस्थित असलेल्या काही लोकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या कागदपत्रांवर करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर पक्षांतर्गत धुसफूस आणखी चव्हाट्यावर आली आहे.

‘तृणमूल’ वर दावा करण्याची तयारी?
Bengal politics पक्षाचे निलंबित प्रवक्ते रिजू दत्ता हे सातत्याने पक्ष नेतृत्वावर टीका करत असून संघटनेत गंभीर त्रुटी असल्याचे आरोप करत आहेत. त्यातच काही नाराज नेते आता ’तृणमूल’ या नावाशी साधर्म्य असलेला नवीन राजकीय मंच स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही गणिते जुळल्यास थेट पक्षावरही थेट दावा केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, जवळपास १५ ते २०  आमदार या नाराज नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि ते पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा गट तयार करत आहेत.