आजी व माजी नगराध्यक्षांच्या साक्षीने गट्टूमुत वृक्ष अभियान

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
 वैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम
 
वर्धा, 
Gattu Mukt Vriksha Mission डॉटरांनी मनुष्याच्या प्रकृर्तीची काळजी घ्यावी... त्यांना औैषधं द्यावी आणि खोर्‍याने पैसा ओढावा असा प्रकार गावखेड्यासह शहर आणि महानगरात पहायला मिळतो. परंतु, वर्धेतील काही डॉटरांची नजर पर्यावरणावर पडली. त्यांनी मनुष्याच्या प्रकृर्ती सोबत पर्यावरणाच्या प्रकृर्तीची जबाबदारी स्वीकारली. शहरात झालेल्या विकासातील गट्टूमध्ये झाडांचा श्वास गुदमरत होता. त्या झाडांवर डॉटरांची नजर पडली. गेल्या दोन दिवसांपासुन वैद्यकीय जनजागृती मंचच्या डॉटरांनी आजी माजी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत गट्टूमुक्त वृक्ष अभियान राबवण्यात आले.
 
 
abhi
 
Gattu Mukt Vriksha Mission  वर्धेत वाढत असलेले तापमान पुढल्या वर्षी कमी करण्याकरिता नगर परिषदेने पावसाळ्या पुर्वी सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी वृक्षारोपन, पावसाचे पाणी वाहुन न जाता जमिनीत शोष खड्डे करुन जिरवावे आदी उपाय करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन वैद्यकीय जनजागृती मंचचे सदस्य महेश अडसुळे, कुंडलीक बेसेकर यांनी शहरातील सिमेंट रस्त्याच्या बाजूला गट्टू किंवा क्राँकीट झाडाच्या बुंध्यापर्यंत केलेले असल्यामुळे झाडांना पाणी मिळत नसल्यामुळे झाडांची वाढ खुंटलेली असुन काही दिवसांनी झाडे मरण्याची शयता असल्याने त्या झाड्यांच्या बुंध्या जवळील गट्टू काढण्याकरिता अभियान राबवावे अशी विनंती केली. वैद्यकीय जनजागृती मंचने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना गट्टू काढण्याची परवानगी मिळण्याकरिता निवेदन दिले. परवानगी मिळताच ३१ मे रोजी आर्वी नाका ते पावडे नर्सिंग होम येथील रस्त्यावरचे गट्टू काढण्याचे अभियान राबविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, आदींसह सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी व मंचाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पांगुळ यांनी वर्धा शहरातील गट्टू मुक्त वृक्ष अभियान नगर परिषदतर्फे राबविण्यात येईल असे आश्वासन दिले.