गोंदिया,
Gondia News शहरातील व्यावसायिक शैलेश अग्रवाल यांच्या गोविंदपूर शास्त्री वार्ड परिसरातील बारदाना फॅक्टरीसह शेजारील दोन गोदामांना आज, २ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील बारदाना तसेच प्लास्टिकचे इतर साहित्य जळून खाक झाले असून शेजारील, गुडाखू फॅक्टरी आणि मित्तल ट्रेडर्स यांच्या गोदामातील साहित्य जळून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदामात साठवून ठेवलेले प्लास्टिकचे बारदाना, प्लास्टिकचे पाइप, टाइल्स तसेच इतर उपयुक्त साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची तीव्रता मोठी असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र, जवळपास एक किलोमीटर पासून आगीचा धूर दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच गोंदिया नगरपरिषदेच्या पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सध्या ५० टक्के आगीवर नियंत्रण मिळवता आले असून अग्निशमन पथकाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची झालेली गर्दी पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलिस दल तैनात करण्यात आले असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.
चार दिवसांत दुसरी घटना...
बारदाना कंपनीला आग लागल्याची ही चार दिवसांतील दुसरी घटना असून यापूर्वी शनिवारी ३० मे रोजी जवळच्या फुलचूर येथील एका बारदाना कंपनीला आग ला