- महायुतीतील बंडखोरांनाही समजावणार
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका
नागपूर,
जागतिक बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीमुळे कांदा निर्यातीसमोर काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास कटिबद्ध असल्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे Guardian Minister Chandrashekhar Bawankule पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कांदा उत्पादकांचे प्रश्न, महायुतीतील बंडखोरी, लाडकी बहीण योजना तसेच विविध समकालीन मुद्द्यांवर सरकारची भूमिका मांडली. कांदा व्यापारी आणि उत्पादकांच्या अडचणींचा सरकार गांभीर्याने विचार करत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हीच शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीतील काही इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नाराज असतील तर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना माघार घेण्यास प्रवृत्त केले जाईल. निवडणुकीत महायुतीची एकजूट कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेबाबत होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. ही योजना कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थी यादीत काही नावे वगळली गेली असतील तर त्याची पुनर्तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
Guardian Minister Chandrashekhar Bawankule महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी अशा आरोपांकडे सूचकपणे पाहण्याची गरज असल्याचे म्हटले. काँग्रेसच्या नागपूरमधील उमेदवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, “निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल,” असे सांगत प्रतिक्रिया दिली.