तीन अपक्ष रि ̈गणात : भाजपाच्या बंडखोरीवर प्रश्नचिन्ह
यवतमाळ,
Local Self-Government Bodies Legislative Council Election यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दाखल नामांकन अजारची छाननी प्रक्रिया मंगळवार, 2 जून रोजी पूर्ण झाली. महायुतीकडून दुष्यंत सतीश चतुर्वेदी आणि महाविकास आघाडीकडून साहेबराव दत्तराव कांबळे हे दोन उमेदवार पात्र झाल्याने या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार आहे.
महायुतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतरही भाजपाने उमदेवार रि ̈गणात उतरविला होता. मात्र, छाननीदरम्यान भाजपाचे उमेदवार नितीन भुतडा यांचा अधिकृत एबी फॉर्म जोडला नसल्यामुळे अपक्ष ठरविण्यात आले. त्यामुळे आता महाविकास आघाडी व महायुतीत मुख्य लढत होणार आहे. यवतमाळ विधान परिषदेची निवडणूक तब्बल चार वषारच्याप्रतीक्षेनंतर होत आहे. हा यवतमाळ जिल्हा मतदारसंघयापूर्वी शिवसेनेच्या ब्यात सल्यामुळे महायुतीकडून शिवसेनेची प्रथम दावेदारी आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मावळते मदार दुष्यंत चतुर्वेदी यांनीच पुन्हा नामांकन दाखल केले आहे. मात्र, नामांकन दाखल रताना मित्रपक्षातील नेत्यांना निमंत्रणच नसल्याने नाराजीचा सूर आहे. मात्र, महायुतीतील र्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्यात महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाऊ, असे
दावे केल्याने यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेतसुद्धा भाजपाकडून महायुतीचा धर्म पाळण्यात येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. गुरुवार, 4 जून रोजी नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने भाजपाचे ‘स्वघोषित’ मेदवार,माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान जिल्हा समन्वयक नितीन भुतडा नामांकन मागे घेऊन महायुतीसाठी काम करणार की भाजपा पक्षश्रेष्ठींनी मोकळे सोडल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, याकडे सवारचे लक्ष लागले आहे.
अपक्ष की भाजपा..?
उमरखेड तालुक्यातील जिल्ह्याचे नेते म्हणून ओळख असलेले भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल केले. मात्र, त्यांचे नामांकन छाननीत अपक्ष ठरविण्यात आल्याने भुतडा हे पक्षातील आपले वजन वापरून मके काय करणार, याकडे सवारचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर अपक्ष सय्यद फारुख सय्यद करीम आणि साजिद बेग हाफिज बेग मिर्झा हेसुद्धा रि ̈गणात आहेत.