नवी दिल्ली
Donald Trump tariff अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सध्या जागतिक बाजारपेठेत प्रचंड खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी टेरिफच्या नियमांमध्ये थेट बदल करत एका अत्यंत महत्त्वाच्या आदेशावर स्वाक्षरी केली. या नवीन आदेशानुसार, शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाèया मोठ्या मशिनरीच्या आयातीवरील करामध्ये अमेरिकेने मोठी कपात केली आहे. 8 जूनपासून लागू होणाèया या निर्णयामुळे जागतिक व्यापाराचे समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. पण, ट्रम्प यांच्या या खेळीमुळे भारताचे टेन्शन वाढलं आहे.
Donald Trump tariff व्हाईट हाऊसमधे जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेत आयात होणाèया कंबाइन हार्वेस्टर, ट्रॅक्टर, बुलडोझर, फोर्कलिफ्ट आणि इतकेच नाही तर काही विशिष्ट प्रकारच्या एसी सारख्या उपकरणांवर आता खूप कमी कर आकारला जाईल. कंबाइन हार्वेस्टर आणि इतर आधुनिक शेती उपकरणांवर लागणारा तब्बल 25 टक्क्यांचा अवजड टॅरिफ आता थेट 15 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. बुलडोझर आणि फोर्कलिफ्ट यांसारख्या मोबाईल औद्योगिक उपकरणांनाही या 15 टक्के कराच्या कक्षेत आणले गेले आहे.
Donald Trump tariff कोणत्या देशांना मिळणार फायदा
जर एखाद्या परदेशी कंपनीने अशी मशिनरी बनवली असेल, ज्यामध्ये किमान 85 टक्के अमेरिकन स्टील किंवा अॅल्युमिनियम वापरले गेले असेल, तर त्या कंपनीसाठी हा कर आणखी कमी करून थेट 10 टक्के केला जाईल. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जगातील अनेक देशांना फायदा होईल, पण भारताला याचा कोणताही थेट फायदा मिळणार नाही. आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 15 टक्के सवलतीच्या दराचा हा फायदा फक्त जपान, दक्षिण कोरिया, युरोपीय संघ, ब्रिटन आणि तैवान यांसारख्या देशांनाच मिळेल. कारण या देशांसोबत अमेरिकेचे व्यापारी करार आहेत किंवा त्यांना अमेरिकेने विशेष सवलत दिली आहे.
Donald Trump tariff भारताचा अमेरिकेसोबत कोणताही पारंपरिक मुक्त व्यापार करार नाही. त्यामुळे भारतीय उत्पादक आणि कंपन्यांना या कमी टॅरिफचा कोणताही लाभ मिळणार नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली आहे, कारण जागतिक बाजारपेठेत भारताचे प्रतिस्पर्धी देश आता अमेरिकेत स्वस्त दरात माल विकू शकतील आणि भारतीय कंपन्या मागे पडण्याची भीती आहे.