नवी दिल्ली
Narendra Modi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 10 जून 2026 रोजी भारतीय राजकारणामध्ये एक नवीन इतिहास घडवणार आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी हे स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात लोकसभा निवडणूक जिंकून सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा मान पटकावणार आहे. याआधी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 72 वर्ष जुना विक्रम मागे टाकणार आहे.
Narendra Modi जवाहरलाल नेहरू 13 मे 1952 रोजी पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर देशाचे पहिले पंतप्रधान झाले होते. त्यानंतर 27 मे 1964 रोजी निधन होईपर्यंत ते पंतप्रधान होते. या काळात त्यांचा कार्यकाळ हा 4,397 दिवसांचा होता. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. 9 जून 2026 रोजी त्यांचा कार्यकाळ 4,397 दिवसांचा होईल, जो नेहरू यांच्या बरोबरी करेल. 10 जून 2026 रोजी पंतप्रधान म्हणून मोदींचा कार्यकाळ 4,398 दिवसांचा होईल आणि ते निवडून देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून पदावर राहणारे नेते बनतील.
Narendra Modi मागील काही वर्षात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या काळातील अनेक मोठे राजकीय विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जुलै 2025 मध्ये त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सलग 4,077 दिवस पंतप्रधान राहण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी सलग कार्यकाळाच्या बाबतीत नेहरू नंतर दुसèया स्थानावर पोहोचले होते. आता 10 जूनला ते नेहरू यांचा विक्रमही मोडीत काढणार आहे.