वर्धा,
NEET Paper Leak Scandal नीट पेपरफुटी प्रकरण, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणार्या किंमती तसेच खतांच्या दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने मंगळवार २ रोजी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
NEET Paper Leak Scandal नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोयात आले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि खताच्या किंमतीत करण्यात आलेली वाढ यामुळे नागरिक व शेतकरी मेटाकुटीस आल्याने भाव कमी करावे अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव राहुल सुरकर यांनी केले. आंदोलनात विपुल तडाम, अमोल उघडे, शुभम आरगुडे, अमित देशमुख, बाळा माऊसकर, अमित चाफले, जय जगताप यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.