- विनंती बदल्यांमध्ये ‘सेटींग’ची चर्चा : 235 निरीक्षकांची पदाेन्नतीची प्रक्रिया पूर्ण
अनिल कांबळे
नागपूर,
Police Inspectors' Transfers राज्य पाेलिस दलातील पाेलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बहुप्रतीक्षित सर्वसामान्य बदल्यांची यादी जाहीर झाली. राज्यातील 277 पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आस्थापना विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यांच्या सुरुवातीलाच पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित हाेत्या. मात्र, काही पाेलिस अधिकाऱ्यांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडून गुप्तपणे शिारशी केल्यामुळे बदल्यांची तारीख वारंवार बदलत हाेती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाेलिस अधिकाèयांमध्ये नाराजीचा सूर हाेता.
मलईदार ठिकाणी बदली व्हावी, यासाठी गेल्या दाेन महिन्यांपासून पाेलिस निरीक्षक मुंबईच्या चकरा मारत हाेते. त्यामुळे काही पाेलिस अधिकाऱ्यांना ‘क्रीम पाेस्टिंग’ मिळाली तर ज्यांचा वशिला नाही अशा अधिकाèयांना साईड पाेस्टींग मिळाल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत. राज्यभरातील 169 पाेलिस निरीक्षकांना कालावधी पूर्ण झाल्यामुळे बदली करण्यात आली. तसेच 98 पाेलिस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले हाेते.विहित कालावधी पूर्ण करणाèया अधिकाèयांपेक्षा विनंती बदली करवून घेणाèया पाेलिस अधिकाèयांचा ‘क्रीम पाेस्टींग’मध्ये सर्वाधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरापासून पाेलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी बदलीच्या यादीची प्रतीक्षा करीत हाेते. बदलीची यादी पडताच अनेक पाेलिस अधिकारी नव्या ठिकाणी रुजू हाेण्यासाठी शहर साेडण्याच्या तयारीला लागले आहेत.
अखेर सहायक आयुक्तपद मिळणार
Police Inspectors' Transfers गेल्या डिसेंबर महिन्यांपासून वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सहायक पाेलिस आयुक्त, पाेलिस उपाधीक्षक पदावर पदाेन्नती मिळण्याची वाट बघत हाेते. मात्र, आस्थापना विभागाकडून काेणत्याही हालचाली हाेत नव्हत्या. शेवटी राज्यातील 235 वरिष्ठ पाेलिस निरीक्षकांना सहायक पाेलिस आयुक्तपदावर पदाेन्नती देण्यासाठी महसुली संवर्ग मागितला आहे. येत्या आठवड्याभरात एसीपी पदाेन्नतीची यादी जाहीर हाेण्याची शक्यता आहे.
कालावधी पूर्ण न करणाऱ्यांची बदली?
बदल्यांच्या यादीत घाेळ हाेणे हे नेहमीचेच आहे. यावर्षीसुद्धा बदल्यांच्या यादीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही पाेलिस निरीक्षकांचा विनंती बदलीसाठीचा कालावधी पूर्ण झाला नसल्यानंतरही बदलीच्या यादीत नाव असल्याची चर्चा आहे. तसेच काही अधिकाèयांना संवर्गाबाहेर बदली झाल्याची ओरड निर्माण झाली आहे.