नवी दिल्ली
CBSE प्रशांत लोखंडे हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) नवे अध्यक्ष नियुक्त झाले आहेत. केंद्र सरकारने लोखंडे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
CBSE सीबीएसई बारावी परीक्षेच्या अनुषंगाने व्यवस्थापनावर उपस्थित झालेले प्रश्न, मूल्यांकन प्रक्रियेत येत असलेल्या अडचणी आणि तांत्रिक त्रुटींमुळे सध्या हा विषय चर्चेचा मुद्दा बनला होता. या सर्व वादामुळे केंद्र सरकारने सीबीएसईचे अध्यक्ष राहुलसिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची उचलबांगडी केली होती. त्यापाठोपाठ आता आयएएस प्रशांत लोखंडे यांच्याकडे सीबीएसईची जबाबदारी सोपविण्यात आली.