‘असे लोक अशी माणसे’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Publication of the book ज्येष्ठ साहित्यप्रेमी व लेखक दिनकरराव जोशी लिखित ‘असे लोक अशी माणसे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या पुस्तकाचे विमोचन माननीय लक्ष्मणराव जोशी, माननीय सुधीरजी पाठक, प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ इंदूरकर तसेच दीनदयाल नगरचे नगर संघचालक गिरीशजी खेर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
Publication of the book
 
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुस्तकातील विषयवस्तू आणि लेखकांच्या साहित्यसेवेबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून शेवटी श्रीपाद दिनकरराव जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सौजन्य: संदीप देव, संपर्क मित्र