‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी धमाका

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |

Raja Shivaji Box Office
 
मुंबई,
Raja Shivaji's Box Office अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा ऐतिहासिक बायोपिक ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत आहे. मराठीसोबतच हिंदी आवृत्तीतही प्रेक्षकांनी या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिल्याने चित्रपटाने केवळ एका महिन्यातच उल्लेखनीय कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.मराठी आवृत्तीने सर्वाधिक कमाई करत आघाडी घेतली आहे. या आवृत्तीने सुमारे 82.66 कोटी रुपयांची एकूण कमाई करत 70.02 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हा आतापर्यंतचा एक मोठा विक्रम मानला जात आहे.हिंदी आवृत्तीनेही चांगली कामगिरी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हिंदी व्हर्जनने 29.71 कोटी रुपयांची एकूण कमाई आणि 25.15 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवत हिंदी बाजारपेठेत मराठी चित्रपटासाठी नवा मापदंड निर्माण केला आहे.दोन्ही आवृत्त्यांची एकत्रित भारतातील निव्वळ कमाई 95.17 कोटी रुपयांवर पोहोचली असून एकूण देशांतर्गत कमाई 112.38 कोटी रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतूनही चित्रपटाने सुमारे 4.27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे जगभरातील एकूण कमाई 116.65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.