Reduced intensity of the sun उन्हाची तीव्रता कमी झाल्याने पारा ४०.०७ अंश सेल्सिअसवर आहे. पावसाळी वातावरणामुळे दिवस व रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके काहीसे कमी झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढचे काही दिवस नागपूरसह विदर्भात वादळासह मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. े तापमान २ ते ३ अंशाने खाली घसरू शकते. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. मान्सूनचे आगमन १५ जूनपर्यंत नैऋत्य मान्सून अद्याप केरळपर्यंत दाखल व्हायचा आहे. मात्र केरळ ते तामिळनाडू पर्यंत नैऋत्य मान्सून पोहचण्याची शक्यता आहे. विदर्भात मान्सूनचे आगमन नेहमीच्या म्हणजे १५ जूनपर्यंत होण्याचीही शक्यता आहे.