संस्कार भारतीने दिली आबालवृद्ध गायकांना संधी
वर्धा,
Sanskar Bharati's Cultural Program संस्कार भारतीच्या वतीने वर्धेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे मेजवाणी देण्याची परंपरा कायम आहे. स्वर्गीय गायकांना श्रद्धांजली देत त्यांच्या स्वरसाधणेलाही संस्कार भारती उजाळा देण्यासाठी प्रयत्नरत असेत. आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांनी गायलेल्या अमर गीतांना सलाम करण्यासाठी संस्कार भारतीने यावेळी वर्धेतील आबालवृद्धांना संधी दिली. तब्बल ३ तास वर्धेकर रसिकांना आशांच्या गाण्यांची आठव करून दिली.
स्व. सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय व संस्कार भारती वर्धेच्या वतीने स्व. आशा भोसले यांना त्यांचीच गाणी सादर करून श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध व्यवसायी साकेत शर्मा, वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज, संस्कार भारतीचे उपाध्यक्ष माधव पंडित यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी याप्रसंगी प्रत्येकाने एक झाड लावून पर्यावरणाचा समतोल राखावा हा संदेश दिला. गायन आणि वादन यांचा सुरेख मेळ कार्यक्रमात दिसून आला.
निवेदन ज्योती भगत व मिलिंद मशानकर यांनी केले. प्रसिद्ध रांगोळी कलाकार अक्षय सोमनकर यांनी आशाताईंचे सुंदर चित्र रांगोळी द्वारा रेखाटले तर कार्तिक खडतकर यांनी कार्यक्रम सुरू असताना स्वर्गीय आशाताईंचे सुंदर पोट्रेट प्रस्तुत केले. निलय परसोडकर यांनी तांत्रिक बाबी उत्कृष्टपणे सांभाळल्या.
Sanskar Bharati's Cultural Program गाण श्रद्धांजली कार्यक्रमात दिलीप मेने, कवी नेसन, केतकी कुलकर्णी, नितीन वाघ, अमित लांडगे, स्वाती निधेकर, आनंद निधेकर, प्रियंका सहारे, भैरवी मोहदुरे, जान्हवी वंजारी, यशवंत पलेरिया, रिद्धी लेकुरवाळे, मनीष खडतकर, सायली इंगळे, प्रल्हाद मानकर, गिरीश सावळकर, विशाखा सोगे, नीलिमा फासगे, आर्श चावरे, भारती भांडे, अक्षय काटपाताळ, अनुश्री खंगार, ऋत्वा परसोडकर व संस्कृती कुलकर्णी यांनी सुरेल गीते सादर केली. कार्यक्रमाची संकल्पना व आरेखन संस्कार भारतीच्या सहमंत्री केतकी कुलकर्णी यांची होती. यशस्वीतेसाठी उद्धव भुसारी, रूपाली सरोदे, चंद्रकांत सहारे, अनिल खंगार व दिनेश परचाके आदींनी परिश्रम घेतले. संस्कार भारतीचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्कार भारतीचे मंत्री मकरंद उमाळकर यांनी आभार मानले.