-सुनील देवधर यांचे प्रतिपादन
-संवेदना परिवाराच्या वतीने विशेष व्याख्यान
नागपूर :
हिंदू समाजाला आजही अपेक्षित असा शत्रुबाेध झालेला नाही. उलट त्याला बधिर करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. अशा परिस्थितीत स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर यांचे विचार समजून घेणे गरजेचे असून, सावरकरांचा विचारच हिंदूंना संघर्षासाठी प्रेरित करू शकताे, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी वक्ते आणि भाजपा नेते Sunil Deodhar सुनील देवधर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संवेदना परिवाराच्या वतीने रविवारी (31 मे) लक्ष्मीनगर येथील सायंटििफक सभागृहात आयाेजित विशेष व्याख्यानात ते बाेलत हाेते. ‘अखंड भारत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारदृष्टी’ या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित हाेत्या. व्यासपीठावर संवेदना परिवाराचे अध्यक्ष सागर काेतवालीवाले तसेच निशांत अग्निहाेत्री उपस्थित हाेते.
आपल्या व्याख्यानात Sunil Deodhar देवधर यांनी सावरकरांचे संघर्षमय आणि राष्ट्रनिष्ठ जीवनचरित्र उलगडून सांगितले. अखंड हिंदू राष्ट्र हे सावरकरांचे स्वप्न हाेते. मात्र, त्या स्वप्नामागील त्यांची विचारदृष्टी आजच्या पिढीपर्यंत पुरेशी पाेहाेचलेली नाही. सावरकरांचे विचार अभ्यासपूर्वक समजून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. इस्लामिक जिहादच्या मुद्यावर भाष्य करताना देवधर म्हणाले, जिहाद ही संकल्पना नवीन नसून धर्माच्या स्थापनेपासून विविध स्वरूपांत अस्तित्वात आहे. आज हिंदू समाजासमाेर घडणाऱ्या घटनांमुळे त्याची जाणीव अधिक तीव्रतेने हाेत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्या शिवानी दाणी-वखरे यांनी आपल्या मनाेगतात, सावरकरांची राष्ट्रचेतना, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक विचार समाजापर्यंत सातत्याने पाेहाेचविण्यासाठी संवेदना परिवार करीत असलेल्या कार्याचे काैतुक केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आनंद देशमुख यांनी वैयक्तिक गीत सादर केले. संस्थेच्या वतीने सावरकरांची प्रतिमा भेट दिल्याबद्दल आमदार प्रवीण दटके यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन विनय माेडक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुणाल नरसापूरकर आणि संकेत जाेशी यांनी परिश्रम घेतले. श्रुती बाईवार-गाडे यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.