पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत अमेरिकेचा सहभाग

अहमदाबाद येथे 4 जूनपासुन स्पर्धा

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
न्यू यॉर्क
World Yogasana Championship अमेरिकन योग संघ 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद येथे होणाèया पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत सहभागी होणार आहे. यूएस योग असोसिएशन (यूएसवायए)ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यूएस योग स्पोर्ट्स फेडरेशनने यूएसवायए आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहकार्याने हा संघ तयार केला आहे.
  
yogasan
World Yogasana Championship प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, यूएस योग असोसिएशन आणि यूएसवायएसएफचे संस्थापक आणि अध्यक्ष बलविंदर सिंग हे 11 सदस्यीय अमेरिकन संघाचे नेतृत्व करतील. भारतात होणाèया या स्पर्धेसाठी संघाची निवड एप्रिलमध्ये कनेक्टिकट येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या चाचण्यांच्या आधारे करण्यात आली. सहभागी खेळाडूंचे वय 10 ते 55 वर्षे असून ते विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये भाग घेतील.
 
World Yogasana Championship अमेरिकन योगासन संघाच्या सदस्यांनी भारत दौèयावर जाण्यापूर्वी गेल्या आठवड्यात न्यू यॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला भेट दिली आणि उपवाणिज्यदूत विशाल हर्ष यांची भेट घेतली. वाणिज्य दूतावासाने सहभागींना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांतील खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ही अजिंक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऐक्य, आरोग्य आणि सांस्कृतिक आदानप्रदान यांना प्रोत्साहन देण्यात, तसेच योगाला जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्पर्धात्मक खेळ म्हणून स्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
 
World Yogasana Championship स्पर्धक कलात्मक आणि लयबद्ध योगासह सात अधिकृत योगासन प्रकारांमध्ये सहभागी होतील. जागतिक स्तरावर प्रमाणित केलेल्या मूल्यांकन निकषांनुसार खेळाडूंचे सामर्थ्य, लवचीकता, संतुलन, सहनशक्ती आणि अचूकता यावर आधारित मूल्यांकन केले जाईल.