सेलू
water supply project work शहराच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत असून भूमिगत जलवाहिनी टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
water supply project work बोरधरण येथून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मुख्य सिमेंट रस्त्यांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरासाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभाचे बांधकाम पूर्णत्वास गेले असले तरी जलवाहिनी टाकण्याच्या प्रक्रियेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी एकाचवेळी खोदकाम करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. खोदकामातून निघालेली माती रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आल्याने वाहनधारकांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. नियमानुसार एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसर्या बाजूचे काम सुरू करणे अपेक्षित असताना दोन्ही बाजूंनी खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यत केली जात आहे.
water supply project work मेडिकल चौक ते घोराड हा मार्ग शहरातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. विद्यार्थी, नोकरदार व व्यापारी याच मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्यावर पडलेले मातीचे ढिगारे, उघडी चर आणि खोदकामामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अपघाताचा धोका वाढला आहे.
water supply project work स्थानिक नागरिकांनी नगर पंचायत प्रशासन व संबंधित कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विकासकामे आवश्यक असली तरी ती नागरिकांना वेठीस धरून नव्हे, तर योग्य नियोजन आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन व्हावीत, अशी भावना नागरिकांनी व्यत केली आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने कामाचे नियोजन करावे, खोदकाम पूर्ण झालेल्या भागांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.