शांततेच्या चर्चेनंतरही मध्यपूर्वेत १८ ठार

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
लेबनॉन
18 killed in Middle East इस्रायल, इराण आणि लेबनॉन यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अमेरिका-इराण शांतता चर्चेनंतर परिस्थिती शांत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच लेबनॉनमध्ये झालेल्या ताज्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील वातावरण पुन्हा तणावपूर्ण बनले आहे. या हल्ल्यांमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील अनेक भागांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईनंतर सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दुसरीकडे, सीमावर्ती संघर्षात काही इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे, ज्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.
 
 

East lebanon
 
या घडामोडींमुळे अमेरिका आणि इराण यांच्यात नियोजित असलेल्या पुढील चर्चांवरही परिणाम झाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये होणारी महत्त्वाची बैठक सध्या स्थगित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की, क्षेत्रातील लष्करी कारवाया थांबल्या तरच पुढील चर्चा पुढे सरकू शकते.दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील हालचालींवरही जगाचे लक्ष लागले आहे. शांतता चर्चेनंतर तेलवाहू जहाजांची वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे. जागतिक ऊर्जा बाजारावर या परिस्थितीचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.