वर्धा
delayed rain शहरासह लगतच्या १३ गावांना महाकाली येथील धाम प्रकल्पातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. सद्यःस्थितीत धाम प्रकल्पात पिण्यायोग्य ३६.६० टके जलसाठा उपलब्ध आहे. पाऊस लांबल्यास पाणीपातळीत घट होऊन नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
delayed rain यंदा वर्धा जिल्ह्यातील तापमान देशात तिसर्या क‘मांकावर होते. मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव‘ता अधिक होती. एप्रिल महिन्यात ४२ अंश सेल्सिअसच्यावर तापमान होते. तर मे महिन्यात पारा ४७.८ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी, पाणीपातळीत कमालीची घट झाली. जिल्ह्यातील काही भागात मे महिन्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. काही गावांत टँकरने पाणी विकत घेऊन नागरिकांना गरज भागवावी लागली. यामध्ये गोपालकांचे प्रचंड हाल झाले.
यंदा अवकाळी पाऊस सुद्धा पडला नाही. परंतु, गतवर्षी धुव्वाधार पाऊस पडल्याने जलाशये तुडूंब भरली गेली. ऑटोबर २०२५ मध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पाणीपातळी खालावली नाही. यामुळे जिल्ह्यातील काही भाग सोडला तर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. रोहिणी नक्षत्र संपूर्ण कोरडे गेले. तर मृगात केवळ दोन ते तीन दिवस पाऊस आला. पुढे मृगनक्षत्र कोरडे गेल्यास पाणीपातळीत घट होऊ शकते.
delayed rain धाम प्रकल्पातून शहरासह १३ गावांना पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पात ३६.६० टके जलसाठा शिल्लक आहे. यामुळे शहरासह लगतच्या १३ गावांत सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. पुढे पाऊस लांबल्यास नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसू शकते.
वैरणाची टंचाई
delayed rain जिल्ह्यातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत असून वैरणासाठी हिरव्या चार्याची बारमाही पेरणी करतात. रोहिणी नक्षत्रापाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले असून शेतातील विहिरीतील पाणी पातळी खालावली आहे. यामुळे पुढे पाऊस लांबल्यास वैरण टंचाई निर्माण होऊन गुरांना पिण्याच्या पाणीसाठी भटकंती करावी लागणार आहे.
delayed rain प्रकल्प उपयुत जलसाठा
बोर ५१.०३
निम्न वर्धा ४३.६९
धाम ३६.६०
पोथरा १५.९
पंचधारा २७.५४
डोंगरगाव ३५.११
मदन २९.४५
मदन उन्नई धरण ००
लाल नाला २८.८२
वर्धा कार प्रकल्प २५.१६
सूकळी लघू प्रकल्प १३.१६