गणपतीपुळेच्या समुद्रात ५ पर्यटक बेपत्ता

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
रत्नागिरी,
5 tourists go missing in the sea at Ganpatipule. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे बीच येथे एक हृदयद्रावक घटना घडली. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील काही जण अचानक समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये अडकले. या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील ५ पर्यटक बेपत्ता झाले असून, त्यांच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून २१ जणांचा गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान काही जण समुद्रात उतरले असताना अचानक लाटांचा जोर वाढला. पाण्याचा अंदाज न आल्याने एकूण ८ जण खोल पाण्यात ओढले गेले.
 
 
गणपतीपुळेच्या समुद्रात
 
घटना लक्षात येताच किनाऱ्यावर उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या तत्परतेमुळे ८ पैकी ३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र उर्वरित ५ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. समुद्रात बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. किनारपट्टी परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून, बचावकार्य वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पर्यटकांना समुद्रात उतरताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या सर्वांचे लक्ष शोधमोहीमेच्या पुढील अपडेटकडे लागले आहे.