धानोरा
land mafias तालुक्यातील चातगाव परिसरात शासकीय नियमांची उघडपणे ऐशीतैशी करत सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या महसूल पथकाने अवैध मुरुमाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रंगेहात पकडून जप्त केले. या कारवाईमुळे तालुक्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
land mafias चातगाव परिसरात बेकायदेशीर मुरुमाची राजरोस वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला. दबा धरून बसलेल्या पथकाने मुरुमाची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर रंगेहात पकडले. हे वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी तातडीने तहसील कार्यालय धानोरा येथे जमा करण्यात आले आहे.
land mafias प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत सदर जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर चातगाव येथील स्थानिक रहिवासी सुरेश किसन शेणमारे यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक संपत्तीची चोरी करणार्या वाहन मालकावर आणि जप्त वाहनावर कडक दंडात्मक कारवाईची प्रक्रिया धानोरा तहसील कार्यालयाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
land mafias तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या पथकाने रात्रीच्या अंधारात मैदानात उतरून ही यशस्वी कामगिरी केली. या मोहिमेत नायब तहसीलदार अल्पेश वसंत बारापात्रे, ग्राम महसूल अधिकारी अक्षय शेडमाके, दिनेश पदा, उत्तम गावडे आणि प्रसाद मडावी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
land mafias तालुक्यात शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक साधनसंपत्तीचे अवैध उत्खनन किंवा वाहतूक करणार्यांची गय केली जाणार नाही. मग ती दिवसा असो वा रात्री, अशा भूमाफियांविरोधात यापुढेही अधिक तीव्र आणि कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार गणेश माळी यांनी दिला आहे.