एक रुपयात पीक विमा योजना पूर्ववत सुरू करा -खा. काळे

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Amar Kale शेतकर्‍यांना पीक विम्याच्या रक्कमेतून वगळण्यात आले तर काही ठिकाणी अगदी नगण्य अशी ५००-६०० रुपयांपर्यंत पीक विम्याची लाजीरवाणी नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे पीक विमा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात याव्या, पीक विमा भरपाई ठरविताना ऑनलाईन सर्व्हेवर अवलंबून न राहता कृषी विभाग व महसुल विभाग व विमा प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष क्षेत्र तपासणी करुन विम्याची रक्कम ठरवावी तसेच यापूर्वीप्रमाणेच एक रुपयात पीक विमा योजना कायम ठेवावी या मागणीचे पत्र खासदार अमर काळे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले.
 
dsd
 
शेतकर्‍यांच्या शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कारणाने जे नुकसान होते ते होणारे नुकसान भरुन निघावे म्हणून राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी पीक विमा पद्धती सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळात शेतकर्‍यांकडून फत पीक विमा काढला जायचा. त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी किंवा कंपनीचे कार्यालयच जिल्हयात उपलब्ध नसायचे त्यामुळे शेतकर्‍यांना पीक विम्याचे दावे कुठे करावे व कुठल्या कार्यालयाकडे पाठपुरावा करावा हा यक्षप्रश्न निर्माण झाला. बर्‍याच शेतकर्‍यांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून याबाबत ओरड झाल्याने सध्या कंपनीने आपले जिल्ह्यातील कार्यालय सुरू ठेवले आहे. जिल्हाधिकारी
कार्यालय व कृषी Amar Kale कार्यालयामध्ये या बाबी विषयी सध्या शेतकर्‍यांना माहिती दिली जाते. ऑनलाईन सर्व्हे व प्रत्यक्ष कृषी विभागाद्वारा नुकसानीची पाहणी करताना बरीच तफावत येत असल्याने बर्‍याच ठिकाणी पीक विम्याची नुकसान भरपाई नाकारण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. काही शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी ५०० ते ७०० रुपये अशा रक्कमा देऊन शेतकर्‍यांसोबत थट्टा केली जात असल्याचेही खा. अमर काळे यांनी पत्रात नमुद केले आहे.
 
 
शेतकर्‍यांना मिळणार्‍या पीक विम्याच्या अल्प मोबदल्याच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता निकषात बदल करणे, तसेच एक रुपयामध्ये पीक विमा काढण्याची पद्धत पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली आहे