‘ग्रंथमाले’तून वस्तुसंग्रहालय व्यवस्थापनाचा मार्ग सुकर

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
नागपूर 
Archaeology and Museums राज्यातील वस्तुसंग्रहालयांच्या व्यवस्थापनात एकसंधता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता निर्माण करण्यासाठी ‘वस्तुसंग्रहालय व्यवस्थापन मार्गदर्शक ग्रंथमाला’ तयार करण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या उपक्रमासाठीची जबाबदारी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला देण्यात आली आहे. तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
 
 
ganth
 
पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अखत्यारीतील १४ वस्तुसंग्रहालयांमध्ये सुमारे ५० हजारांहून अधिक दुर्मिळ कलावस्तू, मूर्ती, चित्रे, हस्तलिखिते आणि ऐतिहासिक वस्तूंचे जतन केले जाते. बदलत्या संग्रहालय संकल्पना, डिजिटायझेशन आणि जागतिक व्यवस्थापन मानके लक्षात घेऊन संग्रहालयांसाठी दर्जेदार मार्गदर्शक ग्रंथमालेची आवश्यकता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
या कामासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, संचालकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांत ग्रंथमाला तयार करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. कामाच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी शासनाकडे सादर करावा लागणार आहे. या प्रकल्पावरील खर्च सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील उपलब्ध निधीतून करण्यात येणार असून, खर्चाच्या उपयुक्ततेचे प्रमाणपत्र शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.