आजनसरा
bhojaji maharaj devasthan सेवा आणि समर्पणाचा वारसा जपणार्या आजनसराच्या भूमीत गौरव सोहळा पार पडला. उच्च न्यायालयाच्या आदेशाने आजनसरा ग‘ामपंचायतीच्या प्रशासकपदी नियुत झालेले माजी सरपंच तथा संत भोजाजी महाराज देवस्थानचे विश्वस्त श्रावण काचोळे यांचा देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
bhojaji maharaj devasthan संत भोजाजी महाराज देवस्थान सभागृहात हा छोटेखानी सोहळा पार पडला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, सचिव शिवदास पर्बत, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रमेश ठाकरे, रामा कोपरकर, विनोद आष्टनकर, महेश कोसूरकर, शालिनी ईखार, प्रशासकीय अधिकारी गणेश सोनोने, व्यवस्थापक पिंटू आष्टनकर, सेवार्थ दवाखाना व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश जहागीरदार यांची उपस्थिती होती.
bhojaji maharaj devasthan याप्रसंगी बोलताना काचोळे यांनी भावना व्यत केल्या. सरपंचपदाच्या काळात गावकर्यांच्या आशीर्वादाने अनेक विकासकामे मार्गी लावता आली. आता प्रशासक म्हणून मिळालेली जबाबदारी ही सुद्धा गावसेवेचीच एक संधी आहे. विकासाचा हा भगीरथ असाच अविरत सुरू राहील, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे काचोळे यांनी सांगितले.