स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये नाराजी; सती थांबवण्याची मागणी

रायुकाँ (शप)चे उपविभागीय अभियंताना निवेदन

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट
smart meter हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, या मुख्य  मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस  (शप) गटाच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
 
smart meter
 
smart meter  निवेदनात नमूद केल्यानुसार, महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून या संदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ठिकाणी रिडिंग व युनिट संदर्भातील समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त होत आहेत. अनेक ग्राहकांना त्यांच्या नियमित वापरापेक्षा अधिक युनिट दाखविले जात असल्याची भावना असून, त्यामुळे वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ होत असल्याबाबत चिंता व्यत करण्यात येत आहे.
 
smart meter  तसेच तांत्रिक बिघाड, नेटवर्क समस्या आणि मीटरच्या अचूकतेबाबतही नागरिकांमध्ये शंका निर्माण झाल्या आहेत. या सर्व तक्रारींचे निराकरण होऊन स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांचा पूर्ण विश्वास निर्माण होईपर्यंत शहरातील नागरिकांना स्मार्ट मीटर बसविण्याची सती करू नये, अशी मागणी करण्यात आली.
 
smart meter यावेळी रायुकाँ (शप)चे प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, नितीन भुते, राजू मुडे, शेखर ठाकरे, हुकेश ढोकपांडे, अब‘ार फारुकी, मोहम्मद शाहिद, पंकज भट्ट, सुरेंद्र मुळे, अमर धनविज, योगेश देशमुख, कुणाल गोल्हर, निलेश आवारी, निखिल ठाकरे आदी उपस्थित होते.