जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचे कार्य नविन पिढीला प्रेरणादायी ः माजी मंत्री डॉ.रणजीत पाटील

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
Dr. Ranjit Patil समाजकार्यासाठी पदरमोड करणार्‍या कार्यकर्त्यांपैकी एक श्रीकृष्णा अवचार यांनी संघटनात्मक पदाचा उपयोग शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा जीवनभर प्रयत्न केला . त्यांचे हे कार्य पुढील नविन पिढीसाठी दीपस्तंभा प्रमाणे प्रेरणादायी मार्ग दाखवीत राहील असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले
 
 
amt dksl
 
श्रीकृष्ण अवचार यांच्या अमृत महोत्सव सोहळा दि. २० जून रोजी दुपारी ओंकार लॉन धाड नाका येथे पार पडला. विशेष अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पी सी चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण सहसंचालक राम इथापे उपस्थित होते . माजी मंत्री रणजीत पाटील म्हणाले पद आणि सत्ता या जनसेवेसाठी असतात .त्यांचा वापर करून सामान्याचे प्रश्न मार्गी लावताना सतत संघर्ष करावा लागतो .आपल्या कारकिर्दीत अवचार सरांनी हे सेवाव्रत आयुष्यभर जपले. त्यामुळे आज त्यांचे जीवन सार्थकी लागले आहे. याप्रसंगी श्रीकृष्ण अवचार यांचे अमृत महोत्सवा निमित्त कौटुंबिक औक्षण व भव्य नागरी सत्कार करण्यात आला.तसेच शिक्षण चळवळीतील सेवाव्रती या विशेष अंकाचे प्रकाशन रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
 
 
माजी शिक्षण सहसंचालक राम इथापे म्हणाले की श्रीकृष्ण अवचार यांनी संघटनेचे पदाधिकारी व मी प्रशासन अधिकारी म्हणून अनेक वर्ष सोबत काम केले . त्यांची कार्यपद्धती संयमी स्वभाव व समस्या सोडवण्याची तळमळ जवळून अनुभवण्याचा योग आला. एक निस्पृह संघटनेचा तत्वनिष्ठ पदाधिकारी म्हणून ते माझ्या कायम लक्षात राहिले व सेवानिवृत्तीनंतरही स्नेह कायम राहिला. आपल्या सत्कारा ला उत्तर देताना श्रीकृष्ण अवचार यांनी मी माझे कार्य प्रामाणिकपणे करत गेलो. त्यामध्ये माझे कुटुंबीयाचा मित्रपरिवार आणि सगळ्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे .हे यश केवळ माझ्या एकट्याचे नसून आपल्या सर्वांचे आहे सत्कार प्रसंगी त्यांनी आभार व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय भाषणात पी सी चौधरी म्हणाले की त्यांचा संस्थेबाबत असलेल्या नियमांच्या अभ्यासामुळे अनेक संस्थांना त्याचा फायदा झाला. त्यांना प्रसिद्धीची हाव नाही म्हणूण समाजाला त्यांच्या विषयी माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमा आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रकांत जोशी संचलन शिवशंकर गोरे तर आभार प्रदर्शन स्वप्निल अवचार यांनी केले