मॉर्फ फोटोतील ती तरुणी गिरीश महाजन यांच्या मित्राची मुलगी

अखेर तक्रार पोलिसांकडून..

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
जळगाव,
Girish Mahajan राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित एक कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण झाली आहे. या फोटोबाबत विविध दावे करण्यात येत असून, तो फोटो मॉर्फ करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोपही पुढे आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
 

Girish Mahajan, viral photo controversy, 
मंत्री महाजन यांच्यासोबत दिसणारी तरुणी ही त्यांच्या परिचित मित्राची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संबंधित फोटो डिजिटल पद्धतीने बदलून तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गैरसमज पसरल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात सायबर पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंत्री महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. इन्स्टाग्राम आणि ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संबंधित फोटो हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडूनही Girish Mahajan  या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. फोटो प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची तसेच संबंधित सोशल मीडिया पेजेसची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काही कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारच्या बदनामीला सहन केले जाणार नाही, असे मत मांडण्यात आले आहे. दरम्यान, सायबर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून फोटोचा स्रोत आणि प्रसार याबाबत तांत्रिक तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.