सुकळी प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी आ. बकाने यांचा पुढाकार

शेतकर्‍यांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकार्‍यांची बैठक

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
देवळी
minor Irrigation project देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांना सुकळी (उबार) लघु सिंचन प्रकल्पाचा लाभ मिळावा तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वितरण प्रणालीच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आ. राजेश बकाने यांनी वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा करीत मार्ग काढण्याच्या सुचना केल्या.
 
mla bakane
 
minor Irrigation project आ. राजेश बकाने यांनी सुकळी (उबार) लघु सिंचन प्रकल्प आर्वी तालुयातील महत्त्वाचा प्रकल्प असला तरी त्याच्या लाभक्षेत्रात देवळी मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचा समावेश आहे. मात्र, प्रकल्पाच्या बांधकामाला व वितरण प्रणालीला अनेक वर्षे उलटूनही संपूर्ण कालवा व्यवस्था आणि त्यावरील बांधकामे जीर्णावस्थेत पोहोचली आहेत. प्रकल्पाची अधिकृत सिंचन क्षमता १७५० हेटर इतकी असली तरी वितरण प्रणालीच्या दयनीय स्थितीमुळे अपेक्षित क्षेत्राला पाणी मिळत नाही. सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यापैकी तब्बल ६० ते ७० टके पाण्याचा दरवर्षी अपव्यय होत असल्याने लाभक्षेत्रातील अनेक शेतकरी प्रत्यक्ष सिंचनापासून वंचित राहत आहेत. विशेषतः आंजी (मोठी) व परिसरातील शेतकर्‍यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत असल्याचे आ. बकाने यांनी बैठकीत स्पष्ट केले.
 
minor Irrigation project शेतकर्‍यांच्या मागणीनुसार सुकळी (उबार) लघु सिंचन प्रकल्पाच्या संपूर्ण वितरण प्रणालीचे नूतनीकरण, जीर्ण झालेल्या बांधकामांची पुनर्बांधणी, मायनर कॅनलची दुरुस्ती, पाटसर्‍यांचे मजबुतीकरण तसेच कालव्यांचे अस्तरीकरण या कामांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. शेतकर्‍याला पाणी मिळावे, पाण्याचा होणारा अपव्यय थांबावा आणि शेती उत्पादन वाढावे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आ. बकाने म्हणाले.
बैठकीला लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कापसे, लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, गजानन कडू, अमोल माजरे, मारोतराव कारणकर, अमित जगताप यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.