सात बेपत्ता मुले-मुली पालकांच्या स्वाधीन

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
देवळी
missing children देवळी पोलिस ठाण्यात दाखल मिसिंग आणि अपहरण प्रकरणातील बेपत्ता मुले-मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
 
missing children 
missing children पोलिस महासंचालक यांच्या आदेशानुसार ऑपरेशन शोध मोहीममध्ये संबंधित पोलिस स्टेशनला ८ ते २२ जूनपर्यंत दाखल असलेल्या मिसिंग, अपहरण आदींबाबत शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवळी पोलिसांनी दाखल असलेल्या सर्व मिसिंग, अपहरणाच्या गुन्ह्याचा आढावा घेतला.
 
missing children मिसिंग आणि अपहरण यातील बेपत्ता मुले-मुलींचा शोध घेतला. दरम्यान, पोलिसांनी सात प्रकरणांचा कौशल्य वापरून शोध घेतला. पाच मुली व दोन मुले त्यांच्या पाल्यांच्या ताब्यात दिले. देवळी पोलिस ठाण्यात १८ वर्षाखालील पीडित मुलींचा शोध घेऊन त्यातील आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. पीडिताला कायदेशीर प्रकि‘या पूर्ण करून तिच्या पालकाच्या ताब्यात दिले.
 
missing children ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग‘वाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, पोलिस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलिस कर्मचारी सतिश दरवरे, दुर्गेश बानदे आदींनी केली आहे.