गडचिरोली नगरपालिका पोटनिवडणूकीत 75 टक्के मतदान

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
गडचिरोली, 
Municipal Council By-election गडचिरोली नगरपालिकेचे हनुमान वॉर्डातील तात्कालीन नगरसेवक मुक्तेश्‍वर काटवे यांच्या अकाली निधनानंतर आज घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत 75 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एकंदरीत संपूर्ण निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणूकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लडत पहायला मिळाली. भाजपाकडून गोलू नैताम तर काँग्रेसकडून विनोद भांडेकर हे उमेदवार रिंगणात होते.
 

gad 
 
या वॉर्डात 1656 पुरुष आणि 1837 महिला असे एकूण 3493 मतदार आहे. यापैकी 2620 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. यामध्ये बुथ क्रमांक 1 मध्ये 317 पुरुष तर 372 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तर बुथ क्रमांक 2 मध्ये 338 पुरुष तर 332 महिला, बुथ क्रमांक 3 मध्ये 324 पुरुष तर 325 महिला, बुथ क्रमांक 4 मध्ये 287 पुरुष तर 325 महिला असे एकूण 2620 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.
 
गडचिरोली शहरातील अत्यंत चुरशीची समजल्या जाणार्‍या हनुमान वॉर्डातील ही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूकीनंतर आता या लढाईत कोण जिंकणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असला उद्या, 21 जून रोजी या वॉर्डातील ‘किंग मेकर’ ठरणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.