अमरावतीत ४६४८ विद्यार्थी देणार ‘नीट’ परीक्षा

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
 
अमरावती, 
‘NEET’ Exam in Amravati राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) रविवारी होत असून यात अमरावती जिल्हयातील सुमारे साडे चार हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहे. परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षा केंद्रावर विशेष वाहनातून सुरक्षेसह प्रश्नपत्रिका पोहोचणार आहेत.
 
 
neet sa
 
रविवारी दुारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नीट यूजी परीक्षा होणार आहे. विद्यार्थीना परीक्षेत सहभागी होण्यासाठी पूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. प्रवेश प्रक्रिया ओळखपत्र व चौकशी अंती विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. देशभरातील २२ लाख विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार असून अमरावती जिल्ह्यातील ४ हजार ६४८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग व शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही परीक्षा यशस्वी केली जाणार आहे.
दरम्यान, शनिवारी स्टेट बँक येथे परीक्षेचे संदर्भात मॉक ड्रील करण्यात आले. प्रश्नपत्रिकांना सुरक्षित पोहोचविणे व परीक्षा केंद्रावर वितरीत करण्याबाबत मॉक ड्रील करण्यात आले. रविवारी होणार्‍या परीक्षेच्या सुरक्षेसाठी १ उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक व १० उपनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष लक्ष ठेवण्यासाठी पाच पोलिस कर्मचारी साध्या वेशात तैनात राहणार आहेत. परीक्षा केंद्रावर ४५ पोलिस तर २२ महिला पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत.
 
परीक्षा केंद्रावर सुरक्षा
रविवारी होणार्‍या नीट यूजीच्या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. २० जूनच्या रात्रीपासून सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त असणार आहे. परीक्षा केंद्राच्या आसपास विनाकारण फिरणार्‍यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष गस्त पथक देखील लक्ष ठेवणार आहे. परीक्षा केंद्रावर केवळ पीरक्षार्थी व अधिकृत कर्मचार्‍यांना प्रवेश मिळणार आहे.