मुंबई
Pawanraje Nimbalkar तब्बल दोन दशकांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागनार असून या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा दिवस अत्यंत भावनिक आणि निर्णायक मानला जात आहे. वडिलांच्या हत्येनंतरच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती.पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण काय होते ? ते जाणून घ्या.
पवनराजे निंबाळकर हे धाराशिवमधील प्रतिष्ठीत व्यक्ती होते. राजकारणात त्यांना मानणारा वर्ग होता. हेच त्यांचे राजकीय यश काही जणांना खुपत होते . त्यातून ही हत्या झाली. पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून धडाधड गोळ्या झाडल्या, त्यात पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांचा मृत्यू झाला. सध्या धाराशिवचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर याच घटनेमुळे राजकारणात आले. तब्बल 15 वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्सिंह पाटील यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप होता.
पद्सिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत बंधु आहेत. सीबीआयने पद्सिंह पाटील यांच्या नावाचा मुख्य आरोपी मध्ये समावेश केला. राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे पद्सिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळकर यांना मार्गातून हटवले. हत्या घडवण्यासाठी भाडोत्री गुंडांना पैसे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पद्सिंह पाटील हे महाराष्ट्राचे माजी मंत्री असून ते धाराशिवचे माजी खासदार आहेत. राजकीय कारकिर्दीत पद्सिंह पाटील यांनी अनेक मंत्रालये संभाळली. सुनावणी दरम्यान 128 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. यात समाजसेवक अण्णा हजारे सुद्धा होते. माफीचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैनने हे सुद्धा कबूल केले की, पद्सिंह पाटील यांनी अण्णा हजारेंना मारण्याची सुद्धा सुपारी दिली होती.
पद्सिंह पाटील, लातूर येथील Pawanraje Nimbalkar बिझनेसमन सतीश मंदादे, निवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला आणि हल्लेखोर हे या प्रकरणात आरोपी आहेत. केस रेकॉर्डनुसार , मंदादे आणि शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांना मारण्यासाठी पारसमल जैनला 30 लाखाची सुपारी दिली. पारसमल जैन नंतर माफीचा साक्षीदार बनला. नवी मुंबई पोलिसांनी सुरुवातीला प्राथमिक तपास केला. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले . पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने हत्येच्या तपासाच्या प्रगतीबद्दल शंका उपस्थित केली होती.
पद्सिंह पाटील यांना जून 2009 मध्ये पहिल्यांदा अटक झाली. अलिबाग येथील सत्र न्यायालयाने त्याचवर्षी सप्टेंबर महिन्यात पद्सिंह पाटील यांना जामीन दिला. जुलै 2011 पासून या प्रकरणात सुनावणी झाली.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला नवी मुंबई Pawanraje Nimbalkar पोलिसांनी केला होता. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. तपासादरम्यान अनेक महत्त्वाच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. एकूण 128 साक्षीदारांनी न्यायालयात जबाब दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांचाही समावेश होता.या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि मंत्री पद्सिंह पाटील यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून आरोप ठेवण्यात आले होते. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने भाडोत्री गुंडांना पैसे देऊन हत्या घडवण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता. याशिवाय लातूरमधील व्यावसायिक, निवृत्त अधिकारी आणि इतर काही व्यक्तींनाही आरोपी करण्यात आले होते.
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, हल्ल्यासाठी सुमारे 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये काही मध्यस्थांच्या माध्यमातून गुन्हा घडवण्यात आल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार ठरला असून त्याने महत्त्वाचे जबाब दिल्याची माहिती समोर आली होती.
2009 मध्ये या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2011 पासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरू झाली. दरम्यान, अलिबाग सत्र न्यायालयाने काही आरोपींना जामीन मंजूर केला होता. दीर्घकाळ चाललेल्या या सुनावणीनंतर अखेर आज न्यायालयाने निकाल जाहीर केला.या संपूर्ण प्रकरणामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जीवनावर खोल परिणाम झाला होता. वडिलांच्या हत्येनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आज ते स्वतः खासदार म्हणून कार्यरत आहेत. या निकालामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे, असे मानले जात आहे.