सर्जनशील सहाध्यायींचे ज्येष्ठांसाठी चित्रमय स्मरण

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
penting karyashala शासकीय चित्रकला महाविद्यालयात ३६ वर्षांपूर्वी कलाशिक्षण घेतलेले सहाध्यायी १० जिवलग मित्रांचा इंद्रधनू ग्रुप ऑफ आर्टिस्ट व जवाहरलाल दर्डा कलादालन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार दिवसांपासून रंगयात्रा पेन्टींग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तयार झालेल्या चित्रांचे प्रदर्शन शनिवारी सायंकाळी कलादालनात लावण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार हिराचंद विकमसी, तत्व ओरिजिन संस्थेचे प्रमुख व कलासंग्राहक गुरुदीपसिंग कपूर व ललिता पब्लिक स्कूलच्या संचालिका डॉ. चेतना टांक, दालनाचे अभिरक्षक अमित गोन्नाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
 
 
pentsing
 
या अभिनव उपक्रमात कलावंत अनघा साल्पेकर, स्वाती देऊस्कर, अरविंद घोरपडे, दामोदर आर्वीकर, नाना मिसाळ, प्रशांत हरदास राजेेंद्र भुते, राजेंद्र महाजन, राजेंद्र साकल्ले, विजय जयस्वाल व संयोजक अमित गोन्नाडे यांनी चित्रकृती साकारल्या.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भाच्या गतकाळातील चित्रकार बापूराव आठवले, भाऊ समर्थ, भय्याजी गोस्वामी, एन. बी. डिखोळे, डॉ. भानजीभाई पाटणकर, प्रा. धनंजय वर्मा, प्रा. एस. व्ही. साऊरकर, डॉ. डी. बी. बेळे, प्रा. वामन चिंचोळकर, प्रा. दीपक जोशी, सुधीर तलमले या दिवंगतांची चित्रे त्यांच्या नातेवाईकांकडून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली. गतकाळातील आणि विद्यमान काळातील चित्रकृतींचा हा संगम रसिकांना भारावून टाकणारा होता.
 
 
 
या उपक्रमात दिवंगत कलावंतांच्या कलाकृती उपलब्ध करून देणारे मिलिंद लिंबेकर, राजेंद्र पटोरीया, विश्वास डिखोळे, प्रा. अमोल पाटील, अमित गोन्नाडे, तुषार पाटणकर, सतीश साऊरकर, चारुहास बेळे, दुर्गेश तलमले, माजी आमदार दिनानाथ पडोळे यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे, सुरेश व्यवहारे, संजय फुंडकर, डॉ. पानसरे, अनिल वाकोडीकर, ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते.